Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठ परिसरात आज पाच कोरोना पाॅझिटीव्ह

पेठ (रियाज मुल्ला) : पेठ  व पेठ परिसरात आज एकूण 5 जणांचे अहवाल  कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती पेठ आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ.सौ. वैशाली देवापुरे यांनी दिली.
पेठ गावातील 3 पुरुषांचे, महादेववाडी येथील 1 पुरुष तर रेठरेधरण येथील एका वृद्ध महिलेचा असे एकूण 5 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.
महादेववाडी सारख्या छोट्याशा वस्तीत परत एकदा कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर नियमित करावा, वारंवार हाथ धुवावेत, गर्दी ची ठिकाणे टाळावेत,45 वर्षे वरील नागरिकांनी लस घ्यावी असे आव्हान  आरोग्य अधिकारी डॉ. सौ. वैशाली देवापुरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments