Daily Mahasatta

Daily Mahasatta

नेर्लेत रेशनकार्ड पासून वंचित कुटुंबाला मिळाला मदतीचा हात

पेठ (रियाज मुल्ला)
नेर्ले येथील विलास हिंदूराव रणखांबे यांचे कुटुंब रेशनकार्डपासून वंचित होते. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी व ऑपरेशनसाठी रेशनकार्ड आवश्यक होते. नामदार जयंतरावजी पाटील (जलसंपदामंत्री महाराष्ट्र राज्य )यांच्या माध्यमातून व युवक नेते प्रतीक पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून त्यांना रेशनकार्ड तातडीनं उपलब्ध करून दिले.

या रेशन कार्डाचे वितरण नेर्ले ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्या अर्चना पाटील व वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे विद्यमान सदस्य युवा नेते शुभम पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी नेर्ले ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य निवास माने, युवा नेते सुयोग पाटील , बापूराव रणखांबे ,युवा नेते पंकज पाटील, विक्रम पाटील ,संजय बल्लाळ आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments