Daily Mahasatta

Daily Mahasatta

गारपीटग्रस्त शेंडगेवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली पहाणी

आटपाडी ( प्रतिनिधी) : बुधवार  दि .१४ रोजी सायंकाळी तब्बाल अर्धा तास झालेल्या तडाखेबाज प्रचंड गारपीठीने आटपाडी शहराचा भाग असलेल्या २२ किमी वरील शेंडगेवाडीत झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर आटपाडी मतदार संघाचे अध्यक्ष सुशांत देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हयाचे नेते आनंदरावबापू पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक, तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ यमगर, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष जालींदर कटरे, सामाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत, तालुका सरचिटणीस विजय पुजारी यांनी गारपीट ग्रस्त शेत शिवारात फिरून पाहणी केली.

शेंडगेवाडीत झालेल्या गारपीट नुकसानीचे पंचनामे केले गेले असून एकूण ६२ शेतकऱ्यांचे असून ऊस, डाळिंब, मका व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . महसूल व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यात १७ हेक्टर बाधित क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अहवाल केला असल्याचे सांगण्यात आले . आटपाडीचे तलाठी सुधाकर केंगार , आटपाडीचे कृषी सहाय्यक आनंद चव्हाण आटपाडीचे ग्रामविकास अधिकारी यांच्या पाहणी पथकाने गारपीठीची पाहणी करून पंचनामे केले आहेत.

जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. श्री .जयंतराव पाटील यांचे गारपीठीने झालेल्या नुकसानीकडे आपण लक्ष वेधणार असून शासनाकडून जास्तीत जास्त मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळावी यासाठी मंत्री महोदयांना साकडे घालणार असल्याचे सुशांत देवकर, आनंदराव बापू पाटील, सादिक खाटीक यां पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले . शेंडगेवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी . अत्यंत धोकादायक बनलेला बनपूरी - शेंडगेवाडी हा ६ कि.मी. चा रस्ता तातडीने खडीकरण ,डांबरीकरण युक्त करून दिला जावा यासाठी ही मंत्री महोदयां कडे आग्रह धरणार असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगीतले.

या गारपीटीने परिसरातील झाडे, पक्षी, कोंबड्या यांचे नुकसान झाले आहे . एक बोकड ही गारपीटीने मेल्याचे पाहणीवेळी सांगण्यात आले.

यावेळी अनिल दिनकर बाबर , विनायकराव शेंडगे, समाधान पुकळे, दत्ता पुकळे ,समाधान मस्के, दाजी शिंदे हे उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments