Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगली जिल्ह्यात कोरोनाने पाचजणांचा मृत्यू


सांगली (प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्यात आज मंगळवार ता. ६ रोजी ३६८ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दररोज सुमारे चारशे नवीन कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची भर पडत असल्याने आज जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी ब्रेक दी चेन ची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

आज जिल्ह्यात तालुकानिहाय आढळून आलेले कोरोना बाधित रुग्ण पुढीलप्रमाणे: आटपाडी- ३९, जत -३३, कडेगाव-२९, कवठेमंहकाळ-८ खानापूर-२९, मिरज-२८, पलूस -१८, शिराळा-३४, तासगाव- १३ ,वाळवा-४२, तर महापालिका क्षेत्रात सांगली शहर ६४ मिरज शहर -३१ असे सांगली एकूण ३६८ रुग्ण आढळून आले आहेत. आज दिवसभरात १५६ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. तर पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

Post a Comment

0 Comments