Daily Mahasatta

Daily Mahasatta

डाॅ. मेघा गुळवणी यांची राष्ट्रीय कॉलेज ऑफ एज्युकेशन प्राचार्य संघटनेच्या उपाध्यक्ष पदी निवड


डाॅ. मेघा गुळवणी यांची राष्ट्रीय कॉलेज ऑफ एज्युकेशन प्राचार्य संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र व गोवा राज्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळवल्याबद्दल त्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.
विटा (प्रतिनिधी)
विटा येथिल मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या, स्व. चिंतामणी कोंडोपंत गुळवणी शैक्षणिक संकुलातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या व शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मेघा गुळवणी यांची राष्ट्रीय कॉलेज ऑफ एज्युकेशन प्राचार्य संघटनेच्या (नँशनल असोसिएन ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ कॉलेजेस् ऑफ एज्यूकेशन, पेस) उपाध्यक्षपदी निवड झाली.

राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र व गोवा राज्याचे प्रतिनिधीत्व करण्याची ही सुवर्ण संधी मिळाली आहे. राष्ट्रीय पातळीवरिल शिक्षणशास्त्र महाविद्यालयांचे सुसुत्रीकरण करणे, अभ्यासक्रमांची आखणी करणे व महाविद्यालयांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून कार्य करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र विनाअनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालय संघटनेच्या अध्यक्ष पदीही त्या कार्यरत आहेत. विट्याच्या एका महिलेला हा बहुमान मिळाल्याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. त्यांच्या निवडीबद्दल आमदार अनिलभाऊ बाबर, संस्थेचे अध्यक्ष मा. विनोदराव गुळवणी, उपाध्यक्ष सुधाकरशेठ शहा व सर्व संचालक, मुख्याध्यापक व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments