Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी राहुल साळुंखे

विटा (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समिती विटा च्या सभापती पदी आमदार अनिल भाऊ बाबर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते व कमळापुर चे युवा नेते श्री राहुल साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री युसूफ शेख यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना चे सर्व नियम पाळून श्री शेख यांनी श्री राहुल साळुंखे यांची निवड जाहीर केली.

यावेळी संचालक चंद्रकांत चव्हाण, बापूराव शिंदे, राजेश कदम, वीर सिंग पवार, आनंदा माने, विजय कदम ,अंकुश यादव, मोहन पाटील, आलेकर गुरुजी सौ जमदाडे उपस्थित होते यावेळी नूतन सभापती राहुल साळुंखे यांचा आमदार अनिल भाऊ बाबर कृषी राज्यमंत्री विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम ,जिप उपाध्यक्ष सुहास भैया बाबर, नगरसेवक अमोल दादा बाबर, युवा नेते जितेश भैया कदम, विक्रम अण्णा शिंदे ,राजाभाऊ शिंदे ,सभापती महावीर शिंदे ,खरेदी-विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर यांनी सत्कार केला. यावेळी विलास तात्या साळुंखे ,राम भिंगारदेवे ,महेश पवार , रोहित साळुंखे, सुभाष साळुंखे ,विश्वास साळुंखे ,गणेश सुर्वे ,किशोर नलवडे ,फैयाज शेख ,विलास पाटील, दिगंबर मोहिते, विनोद कदम, रमेश गोटपागर , साहेबराव गोतपागर ,राजू गोतपागर, बाबासो साळुंखे, विशाल साळुंखे आनंदा जाधव नामदेव शिरतोडे लक्ष्मण साळुंके भीमराव साळुंखे निखिल साळुंखे अशिष साळुंखे ऋषिकेश साळुंके उपस्थित होते

Post a Comment

0 Comments