Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात आज १३९५ कोरोना पॉझिटीव्ह : जिल्ह्यातील १ हजार ९९० रुग्ण चिंताजनक

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीने उच्चांक केला असून आज दिवसभरात १ हजार ३९५ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आज रोजी जिल्ह्यातील १ हजार ९९० रुग्ण चिंताजनक असून आज जिल्ह्यातील २४ तर अन्य जिल्ह्यातील १३ अशा ३७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

आज तालुका निहाय तपशिल आढळून आलेले कोरोना बाधित रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी- ११०,जत- १०६ ,कडेगाव- ८४, कवठेमहांकाळ- ६९, खानापूर- २४६, मिरज-१४२, पलूस- ६० ,शिराळा-१०१, तासगाव -८८ ,वाळवा- १७३ महानगरपालिका - २१६ (सांगली- १२६, मिरज- ९०) असे एकूण १ हजार ३९५ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 

आज दिवसभरात ८७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संजय साळुंखे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments