Daily Mahasatta

Daily Mahasatta

कवठेमंहकाळ तालुक्यात कडक लाॅकडाऊन, रस्ते सामसुम

कवठेमहांकाळ (अभिषेक साळुंखे),
राज्यशासनाने विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत .या आदेशानुसार शुक्रवारी रात्रीपासूनच कवठेमहांकाळ शहरात या विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू केली आहे. शहरात प्रत्येक चौकाचौकात पोलीसांनी ठाण मांडले आहे. विनाकारण रस्त्यावर बाहेर फिरणाऱ्यांच्याविरोधात आता पोलीसांनी दंडुका उगारला आहे.

या विकेंड लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनी आणि सर्वानी पाठिंबा दिला असल्याने शहरात सर्वत्र शुकशुकाट होता . कवठेमहांकाळ शहरातील नाक्यानाक्यावर पोलीस फौजफाटा लावण्यात आल्याने विनाकारण बाहेर पडण्याचा फंदात पडताना दिसून येत नाहीत . कवठेमहांकाळ शहरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि आस्थापणा बंद ठेवण्यात आल्या आहेत . यामुळे कवठेमहांकाळ शहरातील बाजारपेठेत तुरळक अशी गर्दी दिसून येत आहे . तसेच कवठेमहांकाळ एस. टी. स्टँडवरही शुकशुकाट आहे . शिवाजी चौक , कापडपेठ , म्हसोबा चौक , जुने स्टड या सर्व ठिकाणी शांतता होती . पोलीसांनी काही भागात संचालन करून नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव केला आहे . त्यामुळे कवठेमहांकाळ शहरात विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा गर्दीच्या चौकात पोलीसांशिवाय कोणीही दिसून येत नव्हते . 

Post a Comment

0 Comments