Daily Mahasatta

Daily Mahasatta

ऊस वहातूक कत्रांटदारांची फसवणूक करणाऱ्या मुकादमाला अटक

सोनहिरा खोऱ्यातील शेतकऱ्यांना व ऊस वहातूक कंत्राटदार यांना ऊस तोड मजुर देतो असे सांगून त्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणार्या ऊसतोड मुकादमाला चिंचणी वांगी पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

कडेगाव (सचिन मोहिते) : सोनहिरा खोऱ्यातील शेतकऱ्यांना व ऊस वहातूक कंत्राटदार यांना ऊस तोड मजुर देतो असे सांगून त्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणार्या ऊसतोड मुकादमाला चिंचणी वांगी पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलीसांच्या या धडक कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे. 

जालना येथील मुकादम यांनी लाखो रुपये घेवून सोनहिरा खोऱ्यातील शेतकऱ्यांना व ऊस वहातूक कंत्राटदार यांना ऊस तोड मजुर देतो असे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्या बाबत संपत भाऊ जाधव रा. सोनसळ व विजय दत्तात्रय मांडके रा .शिरसगांव यांनी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याचा तपास चिंचणी वांगी पोलीस करीत होते. सदर आरोपी यांना अटक करण्याकरीता चिंचणी वांगी पोलीसांचे तपास पथक बरेच वेळा जालना येथ जावून आरोपीचा शोध घेत होते. परंतू सदरचे आरोपी यांना पोलीस आल्याची माहीत लागताच पळून जावून लपून बसत होते.

परंतू आरोपी यांना अटक करण्याचा चिंचणी वांगी पोलीसांनी जणु काही चंगच बांधल होता. त्या अनुषंगाने मा. श्री दिक्षीत गेडाम पोलीस अधीक्षक सो सांगली, मा. मनिषा दुबुले अपर पोलीस अधीक्षक सांगली , मा. अंकुश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग यांचे मार्गदशाखाली सहा पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांनी त्यांचे कौशल्य पणाला लावून आरोपींचा तांत्रीकदृष्टया तपास करून माहीती संकलीत करून तपासा करीत पोलीस ठाणेकडील पोलीस हवालदार अमर जंगम, अशोककुमार परीट, जगदीश मोहीते यांचे पथक तयार करून जालना येथे पाठविले होते. मागील तपासाचा अनुभव आल्याने पोलीस हवालदार अमर जंगम यांनी त्याच भागातील लोकांच्या सारखा वेष परिधान करून वेषांतर केले. 

आरोपी राहत असलेल्या गावात मोहाडी व निरखेडा या तांडयामध्ये दिवस- रात्र फिरून आरोपी व गावातील लोकांच्या नजरेतून वाचून आरोपी यांचा लपून बसण्याच्या ठिकाण्याची माहीती गोळा केली. आरोपी यांना पोलीस आल्याची चाहूल लागू न देता वेषांतर केलेले पोलीस हवलदार अमर जंगम यांनी आरोपी प्रकाश गणा राठोड वय ५८ वर्षे रा मोहाडी जि सांगली व साजन परशराम राठोड वय २३ रा निरखेडा यांना पोलीस हवलदार अशोककुमार परीट, जगदीश मोहीते यांचे मदतीने सिनेस्टाईल पध्दतीने अचानक धाड टाकून दिनांक ३ एप्रिल रोजी मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान अटक केली आहे पकडले आहे. सदर गुन्हयात दोन्ही आरोपींना मा न्यायालय सो कडेगांव यांनी बुधवार पर्यंत पोलीस कोठीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पुढील तपास सपोफौ गोविंद चन्ने, पोलीस हवलदार अशोककूमार परीट हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments