Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडात विनाकारण फिरणाऱ्या ११६ जणांची रस्त्यावरच कोरोना चाचणी, पहा कितीजण आले पाॅझिटीव्ह ?

कुपवाड (प्रमोद अथणिकर) : कुपवाड मध्ये सोसायटी चौकात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटी जेन टेस्ट करण्यात येत असून आज 116 नागरिकांची टेस्ट केली असून या मध्ये नागरिक 3 पॉझिटिव्ह मिळून आले आहेत.

कोरोना या महाभयंकर रोगाने थैमान घातले असून कुपवाड परिसरातील नागरिक विनाकारण नागरिक रस्त्यावर फिरत असल्याचे निदर्शनास आले असता सह आयुक्त गायकवाड व मनपा वैधकिय डॉक्टर मयूर औंधकर याच्या टीमने कुपवाड मधील नागरिकांची अँटीजेन टेस्ट केली असता या मध्ये 116 नागरिकांची टेस्ट घेण्यात आली असून या मध्ये 3 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले. यातील एक मनपा क्षेत्रातील असून बाकीचे दोघे ग्रामीण भागातील असल्याचे निदर्शनास आले. मनपा हद्दीतील एकास होम आयसोलशन करण्यात आले आहे व ग्रामीण भागातील असलेल्याना त्या भागात कळवण्यात आले आहे .

या उपक्रमास कुपवाड चे पोलिस निरीक्षक नीरज उबाळे व त्याची टीम व कुपवाड मनपा सह आयुक्त गायकवाड यांच्या मार्गदर्शन खाली डॉ मयूर औधकार ,डॉ अंजली धुमाळ, खंडेराव भाले ,प्रियांका माळी महेश पिसे, प्रसाद चव्हान, मनीषा माळवदे व ज्योती कांबळे याचे यावेळी योगदान लाभले.

Post a Comment

0 Comments