Daily Mahasatta

Daily Mahasatta

चिमुरड्यांना देखील कोरोनाची भीषणता समजली, मास्क वाटून केला वाढदिवस साजरा

पेठ (रियाज मुल्ला) : पेठ तालुका वाळवा येथील कुमारी श्रेया तुळशीदास पिसे या चिमुकलीने  सर्व मित्र मैत्रिणींना मास्क वाटप करून  तिचा वाढदिवस एका वेगळ्या उपक्रमाने साजरा केला.

पेठ येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक व सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास  पिसे  हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.  त्यांची कन्या श्रेया हिने वाढदिवसाच्या निमित्ताने  कोरोनाच्या पार्श्व भूमीवर  आपल्या सर्व मित्र- मैत्रीणींना  व मास्क वाटून वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या वडिलांना कडे आग्रह धरला.  तुळशीदास पिसे यांनी देखील तो तिचा हट्ट  पूर्ण करण्यासाठी  मास्क आणून तिच्या सर्व मित्रांना वाढदिवसाची भेट म्हणून देण्यात  आले.

वाढदिवस म्हंटले  की ज्याचा वाढदिवस त्याला भेटवस्तू मिळतात मात्र या चिमुकलीने काळाची गरज ओळखून सर्व मित्र मैत्रिणींना मास्क चे  वाटप केले. कोरोना चे सर्व नियमांचे पालन करीत घरगुती पद्धतीने हा वाढदिवस साजरा करण्यात आला. मात्र या छोट्या चिमुकलीने मास्क वाटप करून ही काळाची गरज असल्याचा मोठा संदेश दिला आहे.

Post a Comment

0 Comments