Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

गोठ्यास आग लागून ५ जनावरे ठार, ९ लाखांचे नुकसान

शिराळा (विनायक गायकवाड)
येथील शिराळा औढी रस्त्यावरील पाडळी हद्दीतील यादव माळातील तात्यासो बाळू भांडवले यांच्या जनावरांच्या गोठ्यास आग लागून ५ जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये जनावरांचे शेड, पिंजर, शेती औजारे असे मिळून अंदाजे ९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटना सोमवार रोजी रात्री ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास घडली. रात्री उशिरापर्यंत आग विझविणाचे प्रयत्न सुरू होते.

घटनास्थळी असणाऱ्या शेड मध्ये लागलेल्या आगीत २ जातीवंत म्हैशी, १ वासरू, १ खिलार बैल, १ रेडी असे ५ जनावरे भाजून मृत्युमुखी पडले आहेत. तसेच शेती औजारे, पिंजर, शेड पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आग विजविण्यासाठी रात्री परिसरातील पाण्याचे टँकर मागविण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत नागरिकांच्याकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.

मंगळवारी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, मुख्याधिकारी योगेश पाटील, नगरसेवक बंडा डांगे, केदार नलवडे, पोपट गायकवाड यांच्यासह अनेकांनी भेट दिली. त्याचबरोबर काही दानशूर व्यक्ती आपापल्या परीने आर्थिक मदत देऊ करत आहेत.

Post a Comment

0 Comments