Daily Mahasatta

Daily Mahasatta

जत तालुक्यात लसीकरणाचा वेग वाढवा : नाम. विश्वजीत कदम

जत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीत बोलताना नाम. विश्वजित कदम, आ. विक्रम सावंत, प्राताधिकारी आवटे

जत (सोमनिंग कोळी) : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना ची दुसरी लाट सुरू आहे. ही लाट अतिशय गंभीर स्वरूप धारण करू पाहते आहे, यासाठी सरकार घातलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. जत तालुक्यात लसीकरणाचा वेग वाढला पाहिजे. आज जत येथे 20 ते 22 टक्के लसीकरण झालं आहे. यात वाढ करा लोकांनी आजाराला पुन्हा एकदा गांभीर्याने घेतले पाहिजे एक चूक आयुष्य गमवू शकते. त्यामुळे गाफीलपणा अजिबात नको ग्राम समित्या कार्यरत झाल्या पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे कृषी व सहकार्य मंत्री ना विश्वजीत कदम यांनी केले.

नाम. कदम यांनी शुक्रवारी सकाळी जत तालुक्यातील कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी प्रशासनाला सूचना करून कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्याची महत्त्वपूर्ण सूचना केली. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत, प्रांताधिकारी प्रशांत आवटे तहसीलदार हनुमंत म्हेत्रे ,बीडीओ अरविंद धरणगुत्ती कर, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर,डॉ. अशोक मोहिते,जत उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले ,पोलिस निरीक्षक उत्तम जाधव ,जि प सदस्य सरदार पाटील, महादेव पाटील ,अप्पराय बिराजदार ,विक्रम ढोणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नाम. कदम म्हणाले गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाचा स्ट्रेन वेगळा आणि गतीने वाढणारा आहे. सांगलीची स्थिती पाहता रोजचे आकडे आपल्यासमोर आहेत. यासाठी खूप काळजी घेण्याची गरज आहे. सरकार कोणालाही उपाशीपोटी ठेवणार नाही. मुख्यमंत्र्यांनी पॅकेज दिले आहे अजून काही घटकांना मदत दिली जाईल. यात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करायला हवे.

Post a Comment

0 Comments