Daily Mahasatta

Daily Mahasatta

सुनिता उपाध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण

शिरोळ (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत २०२० मध्ये झालेल्या सेट परीक्षेमध्ये श्रीमती सुनिता उपाध्ये समाजशास्त्र विषयात उत्तीर्ण झाल्या आहेत.

श्रीमती उपाध्ये सध्या हातकणगले पंचायत समिती येथे एकात्मिक बालविकास प्रकल्पामध्ये पर्यवेक्षिका म्हणून कार्यरत आहेत. या परीक्षेच्या यशामधे शाहू कॉलेज कोल्हापूर येथील निवृत्त प्राध्यापक श्याम येडेकर यांचे मार्गदर्शन आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी सोमनाथ रसाळ जि. प. कोल्हापूर तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती एस. एस. मुळे यांचे सहकार्य मिळाले आहे.

Post a Comment

0 Comments