Daily Mahasatta

Daily Mahasatta

प्रा. प्रदीप पाटील यांनी कासेगाव शिक्षण संस्थेचा लौकिक वाढवला : नाम. जयंत पाटील

इस्लामपूर (हैबत पाटील) : आविष्कार कल्चरल ग्रुपचे कार्याध्यक्ष, प्रसिद्ध कवी प्रा. प्रदीप पाटील यांच्या 'अंतरीचा भेद' या काव्यसंग्रहाची बडोदा विद्यापीठात अभ्यासक्रमासाठी निवड होणे, हे सांगली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यामुळे कवी प्रदीप पाटील यांनी कासेगाव शिक्षण संस्थेचा लौकिकात भर घातली आहे असे गौरवोद्गार राज्याचे जल संपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी राजाराम नगर येथे काढले.

आविष्कार कल्चरल ग्रुपच्या वतीने प्रा. प्रदीप पाटील यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. प्रा. प्रदीप पाटील यांचा 'अंतरीचा भेद' हा काव्यसंग्रह बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पाठयपुस्तक म्हणून निवडला गेला आहे. याबद्दल हा सत्कार करण्यात आला.

नाम. पाटील म्हणाले, लोकनेते राजाराम बापू पाटील यांनी बडोदा विद्यापीठातून पदवी मिळविली आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड हे सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते होते. अशा ऐतिहासिक व नामवंत विद्यापीठात प्रा. प्रदीप पाटील यांच्या काव्यसंग्रहाची निवड झाली आहे. ते गेल्या २५ वर्षांपासून माझे सहकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे आविष्कारच्या यशस्वी वाटचालीत मोलाचे योगदान आहे. हे यश त्यांनी आपल्या गुणवत्तेने प्राप्त केले आहे. कासेगाव शिक्षण संस्थेचा नावलौकिक त्यांनी नेहमीच वाढविला आहे. यावेळी त्यांनी आविष्कारचे सचिव स्व. राजेंद्र घोरपडे, माजी अध्यक्ष स्व. सुधीर पाटील यांची आठवण काढत त्यांच्या अकाली जाण्याने आविष्कारचा वेग काहीसा मंदावेल, अशी भावना व्यक्त केली. अविष्कारच्या सदस्यांनी कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावे, असे आवाहन केले.

यावेळी आविष्कारचे अध्यक्ष सुनील चव्हाण, उपाध्यक्ष भूषण शहा, माजी कार्याध्यक्ष नजीर शेख, सह सचिव प्रा. कृष्णा मंडले, खजिनदार बालाजी पाटील, माजी खजिनदार धनंजय भोसले, ज्ञानदेव देसाई, विश्वनाथ पाटसुते, विजय लाड, विनायक यादव, अजय थोरात यांच्यासह आविष्कारचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments