Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिराळा तालुक्यातील १८ गावात ४६ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह

शिराळा (विनायक गायकवाड) : तालुक्यातील १८ गावात ४६ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांनी दिली. सागाव मध्ये रुग्ण संख्या वाढत आहेत.

यावेळी पाटील म्हणाले, तालुक्यातील मणदूर, तडवळे, उपवळे, येळापुर, मांगले, गिरजवडे, बेलेवाडी,चरण, पाचगणी याठिकाणी प्रत्येकी १, प.त.वारुण, शिरशी, अंत्री बुद्रुक, वाकुर्डे बुद्रुक या गावात प्रत्येकी २,  कांदे ३, मांगरूळ, कोकरूड गावात प्रत्येकी ४, शिराळा शहरात ५ तर सागाव मध्ये तब्बल १३ असे आज एकूण ४६ रुग्ण यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

Post a Comment

0 Comments