Daily Mahasatta

Daily Mahasatta

सलून दुकानदारांना महिन्याला ५० हजार द्या : आ. सदाभाऊ खोत

इस्लामपूर (सूर्यकांत शिंदे) : राष्ट्रीय नाभिक संघटना व रयत क्रांती संघटना  यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील नाभिक बांधवांच्या व्यथा सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी सलून पार्लर समोर आंदोलन करण्यात आले. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर ता. वाळवा, जि. सांगली येथे मागण्यांचे फलक हातात धरून घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, कोरोनाच्या महामारीमध्ये राज्यातील अनेक सलून व्यावसायिकांनी आर्थिक संकटामुळे आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या केलेल्या नाभिक बांधवांना सरकारने कोणतीही मदत केलेली नाही.  गेली अनेक दिवस सरकारने लॉकडाऊन केल्यामुळे सलून दुकाने उघडता आली नाहीत. अनेक नाभिक बांधवांची दुकाने भाड्याने आहेत. त्याचे भाडे, वीजबिल त्यांच्या अंगावर आले आहे. जर सरकारला दुकाने बंद ठेवायची असतील तर सलून व्यावसायिकांना सरकारने प्रति महिना ५० हजार रुपये मदत देऊन त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी. जर सरकार त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणार नसेल तर आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते लालासाहेब पाटील, प्रवाशी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बजरंग भोसले, नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप झेंडे, इस्लामपूर शहर अध्यक्ष निलेश सूर्यवंशी, मोहसीन पटवेकर, सर्फराज डाके, अजित शिंदे, गणेश सूर्यवंशी, वसंतराव गायकवाड, अतुल सूर्यवंशी, विनोद सूर्यवंशी, तोसिफ इबुसे, महमद इबुसे, जितेंद्र सूर्यवंशी, अभिनव उबाळे, कयुम शेख, विक्रांत गोंदकर, अक्षय सपाटे, अजय जगताप, असिफ डाके व  नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments