Daily Mahasatta

Daily Mahasatta

पलुस तालुक्यात कोरोना रोखण्यासाठी तहसीलदार ढाणे यांचा कठोर निर्णय

पलुस (अमर मुल्ला) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, संचारबंदी चे नियम कडक करण्याच्या मुद्यावर तहसीलदार निवास ढाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चा करण्यात आली.

शनिवार दिनांक 17 रोजी पलुस शहरामध्ये कोविड रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासन व अत्यावश्यक सेवेतील व्यापारी यांची तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली बैठक झाली. सदर बैठकीमध्ये शासनाने सुरू ठेवलेल्या आस्थापना बाबत पुढीलप्रमाणे सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार दिनांक 19 पासून मेडिकल दुकाने वगळता इतर अत्यावश्यक व्यापारी आस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत सुरु राहतील , शनिवार व रविवार सर्व अत्यावश्यक आस्थापणा बंद राहतील. फक्त दूध संकलन डेरी सकाळी व संध्याकळी सुरू राहील 18 रोजी सर्व आत्यावश्यक व्यापारी आस्थापना सकाळी 9.00 ते दुपारी 3.00 या वेळेत सुरु राहतील, याची सर्व व्यापारी बंधू-भगिनींनी नोंद घावी. 

पलूस शहरात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असले कारणाने सर्व व्यापारी बंधू-भगिनींनी दिलेल्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आव्हान यावेळी पलुसचे तहसीलदार निवास ढाणे यांनी केले.

Post a Comment

0 Comments