Daily Mahasatta

Daily Mahasatta

डॉ. शितल बाबर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार


विटा येथिल डॉ शितल अमोल बाबर यांना टॉप 50 लीगल फॅल्कन अवॅार्डस या जगविख्यात आंतरराष्ट्रीय  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या स्नुषा व नगरसेवक अमोल बाबर यांच्या सुविद्य पत्नी आहेत.


विटा ( प्रतिनिधी)
विटा येथिल डॉ शितल अमोल बाबर यांना टॉप 50 लीगल फॅल्कन अवॅार्डस या जगविख्यात आंतरराष्ट्रीय  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या स्नुषा व नगरसेवक अमोल बाबर यांच्या सुविद्य पत्नी आहेत. त्यांनी मिळवलेल्या या नेत्रदीपक यशामुळे विटे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे

नुकतीच या संदर्भात दुबई येथे एक .“*लेक्सटॅाक वर्ल्ड कॅान्फरंस* पार पडली संपुर्ण जगभरातून यासाठी सर्वोत्तम ५० लिगल प्रोफेशनल्स निवडले गेले होते केले गेले. त्यामध्ये डॉ बाबर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कॅान्फरंस मध्ये डॉ शितल बाबर यांना यांना तज्ञ म्हणून “*बायोटेक्नॅालॅाजी पेटेंटींग अंडर ईंडियन पेटेंट ॲक्ट: मॅारल ईश्यूज”* या विषयावर व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे महिलांविषयक असणारे त्यांचे काम लक्षात घेता त्यांना ”*वुमन एंपारमेंट ईन कर्पोरेट लिगल फिल्ड”* याविषया वरच्या पॅनल डिस्कशन साठी चेअरवुमन म्हणूनही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

या कॅान्फरंसमध्ये फ्रांस, रशिया, मलेशिया, यु.ए.ई, बांगलादेश, ओस्ट्रलिया, भारत या सारख्या देशातून स्पिकर्स निमंत्रित करण्यात आले होते. डॉ शितल बाबर यांचे प्राथमिक शिक्षण विटा येथे तर विधी शाखेचे शिक्षण पुणे येथे झाले, सध्या त्या संपुर्ण देशभरात लॉ या विषयात गेस्ट लेक्चरर म्हणून कार्यरत असतात. त्यांनी या विषयात डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. महिलांच्या विविध विषयांवर काम करणाऱ्या समर्पण फाउंडेशन या संस्थेची त्यांनी स्थापना केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे

Post a Comment

0 Comments