Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगली जिल्ह्यात भूकंपाचा धक्का, जिवित किंवा वित्तहानी नाही

शिराळा (विनायक गायकवाड) : शिराळा तालुक्यात चांदोली धरण परिसरात २.९ रिश्टर स्केल तिव्रतेचा भूकंपाचा धक्का आज मंगळवार ता. २० रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जाणवला आहे, अशी माहिती वारणा पाटबंधारे विभागाने दिली आहे. 

याबाबत पाटबंधारे विभागाने दिलेली माहिती अशी, आज दुपारी दोन वाजता चांदोली धरण परिसरात सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू धरणापासून आतमध्ये २० किलोमीटर अंतरावर होता.
भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी वा वित्तहानी झालेली नाही, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

Post a comment

0 Comments