Daily Mahasatta

Daily Mahasatta

विश्रामबाग चौकात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात यावा : पै. धिरज सुर्यवंशी

सांगली (प्रतिनिधी)
विश्रामबाग चौक सांगली येथे धर्मवीर संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, असे निवेदन नगरसेवक, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पै. धिरज सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हंटले आहे, मागील ३ वर्षाच्या महापालिकेच्या प्रत्येक अर्थसंकल्पीय बजेट मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्यासाठी तरतुद केले जाते. पण प्रत्यक्षात कामास सुरुवात केली जात नाही. यावेळी पण सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय बजेट मध्ये १५ लाख रुपयेची तरतुद करण्यात आली आहे. तरी हा पुतळा विश्रामबाग चौक येथे उभारण्यात यावा, असे निवेदन आज सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे उपायुक्त मा. राहुल रोकडे यांना देण्यात आले.

यावेळी नगरसेवक युवराज बावडेकर, संजय कुलकर्णी, प्रकाश ढंग, सुब्राव मद्रासी, संजय यमगर, रणजीत सावर्डेकर, नगरसेविका भारती दिगडे, उर्मिला बेलवलकर, कल्पना कोळेकर, सोनाली सागरे, इम्रान शेख, रघुनाथ सरगर, सुजित राऊत, विश्वजित पाटील, अतुल माने, किरण भोसले, प्रथमेश वैद्य, अमित देसाई, अभिजीत सुर्यवंशी, शांतीनाथ कर्वे, प्रकाश पाटील, अनिकेत बेळगांवे यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments