Daily Mahasatta

Daily Mahasatta

आदीसागर हाॅस्पीटल मधील साहित्याचा नव्या कोविड सेंटरसाठी वापर : आयुक्त

सांगली (प्रतिनिधी) : आदीसागर कोविड सेन्टरमधील सर्व साहित्य सुरक्षित असून यातील व्हेंटिलेटरवर हे खासगी दवाखान्यांना भाड्याने देण्यात आले असून यातून महापालिकेला प्रतिदिन 20 हजाराचे उत्पन्न मिळत असून ते लोकांच्या वापरात येत आहे, अशी माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. आदीसागर कोरोना सेंटरमधील वापरात येणारे सर्व साहित्य हे जिपीएम येथे सुरू होणाऱ्या कोरोना सेंटरसाठी वापरण्यात आल्याचेही आयुक्त कापडणीस यानी स्पष्ट केले.

जिपीएम कोविड सेंटरमध्ये आदीसागर मधील सर्व मशिनरी, बेडस, याचबरोबर एक्सरे मशीन यासह जे साहित्य उपयोगात आणता येईल त्याचा वापर करून जिपीएम मध्ये कोविड सेंटर सुरू केले जात आहे. 18 वर्षावरील सर्वाना लसीकरण करण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार मनपाक्षेत्रात लसीकरण केंद्रे वाढविली जात असून सध्या 14 लसीकरण केंद्रे असून त्यात आणखी 16 केंद्र वाढवले जातील. लसीकरण केंद्र कमी पडू नयेत यासाठी आता सर्व वॉर्डात लसीकरण केंद्र सुरू केले जाणार आहे. यासाठी महापालिका शाळांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू केली जाणार असून मनपाचे 30 लसीकरण केंद्रे सुरू होतील असे कापडणीस यांनी सांगितले. याचबरोबर महापालिका क्षेत्रातील कोविड टेस्टिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था उभी केली जाणार आहे. यामुळे महापालिकेच्या आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये फक्त लसीकरण आणि ओपीडी सुरू राहील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे असेही मनपा आयुक्त कापडणीस यांनी सांगितले. 

कुंभ मेळ्याहुन परतनाऱ्या 14 ते 16 व्यक्ती आहेत त्या सर्वांची तपासणी केली जाईल. त्यांची रॅपिड टेस्ट केली जाईलच शिवाय लक्षणे असल्यास त्यांची आर्टिपीसीआर तापसनी केली जाईल. ज्यांना लक्षणे नाहीत त्यांना होम आयसोलेशन केले जाणार आहे.
महापालिका क्षेत्रात ऑक्सिजनचा साठा संपला आहे असे कुठेही निदर्शनास नाही. याचबरोबर शासनाकडून आणि बेल्लारीच्या स्टील प्लांटमधूनही आपल्याला ऑक्सिजन मिळणार आहे. सध्यातरी आपल्याकडे कुठेही ऑक्सिजन तुटवडा नाही असे कापडणीस यांनी स्पष्ट केले. ऑक्सिजन तुटवड्यामुळे हॉस्पिटलकडून योग्य नियोजन केले. याचबरोबर ऑक्सिजनचे ऑडिट सर्व हॉस्पिटलनी केल्यामुळे ऑक्सिजन गळती बरोबर अन्य कारणामुळे ऑक्सिजन कमतरता तपासण्यात आली. यामुळे वाया जाणारा ऑक्सिजन वाचवता आला. प्रत्येक हॉस्पिटलचे ऑक्सिजनचे ऑडिट सुरू केले आहे.

मनपाक्षेत्रात कोरोना रुग्णांचा मृत्यू दर 2.68 पर्यंत खाली आला आहे. शासनाच्या संकेतस्थळावर 86 लोक मनपा क्षेत्राबाहेरील आहेत. त्यांची आकडेवारी मनपामध्ये वाढली आहे. असे आयुक्त कापडणीस यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments