Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट, चिंता वाढली


सांगली (प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा आज पुन्हा एकदा विस्फ़ोट झाला असून आज सोमवार १२ रोजी एकाच दिवशी ५२६ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे गुढी पाडव्याच्या पूर्व संध्येला जिल्ह्यातील नागरिक आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.

सांगली जिल्ह्यात आज कोरोना चा आकडा पाचशेच्या पार पोहचला आहे. महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात देखील कोरोनाने धुमाकूळ घालायला सुरवात केली आहे. मात्र काही दिवसांनी लाॅकडाऊन पडणार असल्याच्या भितीने नागरिकांची किराणा माल आणि अन्य वस्तू च्या खरेदीसाठी बाजारात झुंबड उडत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बनवलेले नियम पायदळी तुडविले जात आहेत. तर दुसरीकडे रुग्णांचा आणि मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

आज सांगली जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढील प्रमाणे : आटपाडी २८, जत ४३, कडेगाव ५१, कवठेमंहकाळ ३१, खानापूर ५७ मिरज ३९, पलूस २२, शिराळा ४५, तासगाव ६०, वाळवा ७६ तसेच सांगली शहर ४७ आणि मिरज २७ असे जिल्ह्यात एकूण ५२६ रुग्ण आढळून आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४ हजार ४९ रुग्ण उपचाराखाली आहेत. आज २७७ रुग्णानी कोरोना वर मात केली आहे तर ६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0 Comments