आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास कालीन वास्तूचे जतन नरवीर बहिर्जी नाईक यांच्या समाधी स्थळाच्या रूपाने करणे हे माझे भाग्यच असल्याचे आ. अनिलभाऊ बाबर यांनी म्हंटले आहे .
विटा (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे नेतृत्व करणारे नरवीर बहिर्जी नाईक यांच्या बाणुरगड (ता. खानापूर, जि. सांगली) येथील समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार बाबर यांनी दिली आहे.
बाणुरगड येथील समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करून ,बाणुरगड (ता. खानापूर, जि. सांगली) या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक आणि अनुयायांना विविध दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे, या परिसराचा विकास करणे याअनुषंगाने नियोजन करण्यात येईल, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता अशी माहिती आमदार अनिल भाऊ बाबर यांनी दिली.
आमदार बाबर म्हणाले की, शिवरायांचा इतिहास आणि त्यांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्याचपद्धतीने शिवरायांसाठी कार्य करणाऱ्या मावळ्यांचा इतिहासही प्रेरणादायी आहे. नरवीर बहिर्जी नाईक यांनी गुप्तहेरीमधील आपल्या कौशल्याने स्वराज्य स्थापनेत महत्वाचे योगदान दिले. त्यांचे कार्य जगासमोर येण्याच्या दृष्टीने तसेच त्यांच्या कार्यातून सर्वांना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचे समाधीस्थळ असलेल्या बाणुरगड (ता. खानापूर, जि. सांगली) भागाचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगिण विकास केला जाईल, यासाठी विशेष बाब म्हणून भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.
यामध्ये प्रामुख्याने बानुरगड ते समाधी स्थळाकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब होता. भाविक व पर्यटक व अनुयायी यांची गैरसोय होत होती. त्यासाठी बानुरगड ते समाधी स्थळाकडे जाणारा रस्त्यासाठी एक कोटी वीस लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा रस्ता चांगला व दर्जेदार होणार आहे.
तसेच नरवीर बहिर्जी नाईक यांच्या स्मृती जगवण्यासाठी व त्यांचे कार्य पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरण्यासाठी त्या अनुषंगाने सदर ठिकाणी कामे करण्यात येतील. त्याचप्रमाणे नरवीर बहिर्जी नाईक समाधी स्थळ परिसर विकसित करणे यामध्ये बागबगीचे, पेविंग्ज ब्लॉक, व समाधी स्थळ परिसर सुशोभीकरण करणे यासाठी 50 लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे समाधीस्थळ परिसरात सुसज्ज असे सामाजिक सभागृहा बांधणे व त्या अनुषंगिक कामे करण्यासाठी 34 लाख रुपये मंजूर केले आहेत, अशा प्रकारे या परिसराचा कायापालट करून पर्यटनकेंद्र म्हणून विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला असल्याचे त्यानी सांगितले.
हे माझे भाग्यच आहे...
आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास कालीन वास्तूचे जतन नरवीर बहिर्जी नाईक यांच्या समाधी स्थळाच्या रूपाने करणे हे माझे भाग्यच आहे. ही समाधी माझ्या मतदारसंघात आहे हीच मुळात माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. यासाठी भविष्यात आणखीन निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करेन.
- अनिलभाऊ बाबर, आमदार, खानापूर
आधिक वाचा :
बाळासाहेब... तुम्ही उद्घाटनाला यावे !
1 Comments
������������������������������������������������������������������������������������������������������������������������������⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
ReplyDelete