Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

गौंडवाडीत ४५ वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण पूर्ण : सरपंच योगेश लोखंडे

वाळवा (रहिम पठाण) : गौंडवाडी ता. वाळवा येथील ग्रामपंचायतीने जागृकता दाखवत गावातील 45 वर्षा वरील सर्वांना लसिकरण करण्याचा टप्पा पूर्ण केला आहे, अशी माहीती सरपंच योगेश लोखंडे यानी दिली.

सरपंच योगेश लोखंडे यांनी, लवकरात लवकर प्रत्येक नागारीकापर्यंत लसीकरण पोहचले पाहिजे यासाठी स्थानिक नागरीक, आरोग्य अधिकारी यांनी मदत केलेबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. त्याचबरोबर गावातील नागरीकांना आव्हान केले प्रशासनाकडून ज्या सूचना दिल्या जातात त्याचे प्रत्येकांने काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. जेणे करुन कोरोनाचे संकट टाळता येईल.
यावेळी डाॕ. सुवर्णा साळुंखे,भंडारी मॕडम, आरोग्य सेविका, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, शिक्षक ग्रामसेवक, यांचे सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a comment

0 Comments