Daily Mahasatta

Daily Mahasatta

चिंचणी - वांगीचे जयंत थोरात सेट परिक्षा उत्तीर्ण

कडेगाव (सचिन मोहिते) :  वरिष्ठ महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणूनच्या निवडिसाठी विद्यापीठ अनुदान आयोगास आवश्यक असलेली सेट परीक्षा प्राध्यापक जयंत चंद्रकांत थोरात उत्तीर्ण झाले आहेत. सध्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय कडेगाव येथे रसायनशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक  म्हणून कार्यरत असणारे श्री. जयंत थोरात ( चिंचणी -वांगी )यांनी केमिकल सायन्स या विषयातून सेटची परीक्षा दिली होती. 

त्यांनी यापूर्वीचे शिक्षण के.बी.पी  कॉलेज इस्लामपूर येथून बी. एस्सी. पदवी तर वाय. एम .कॉलेज पुणे येथून त्यांनी एम. एस्सी चे शिक्षण पुर्ण केले आहे. तसेच मॉडर्न कॉलेज विटा.  मधून शिक्षणशास्त्र पदवी घेतली आहे. 
त्यांनी मिळवलेल्या यशा बद्दल मंत्री विश्वजीत कदम , लोकनेते आ.मोहनराव कदम (दादा). शांताराम ( बापु ) कदम युवा नेते जितेश भैया कदम,मा.प्रतापराव चवाण अध्यक्ष कृष्णाई पतसंस्था सांगली, प्रा. डॉ पोरे सर (हेड रसायन शास्त्र विभाग), प्रा. गोतपागर सर, प्रा. भरत महाडिक सर,श्री.संदीप माने,व उच्च माध्यमिकच्या प्राचार्या डॉ. एस . डि . कुलकर्णी.  व उच्च माध्यमिकचे सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच त्यांना त्यांचे वडिल श्री.चंद्रकांत विठ्ठल  थोरात  यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Post a Comment

0 Comments