Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात आज कोरोनामुळे ५४ जणांचा बळी

: आज १३६३ नवीन कोरोना पॉझिटीव्ह 

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात आज बुधवार ता. २८ रोजी १३६३ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असून दिवसभरात ५४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. 

सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृत्युचे सुरु असलेले थैमान यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दररोज सुमारे दीड हजार नवीन रुग्ण आणि पन्नासच्या आसपास उपचारादरम्यान मृत्यू होत आहेत. आज सांगली जिल्ह्यातील ३९ आणि अन्य जिल्ह्यातील १५ असे ५४ रुग्णांचा आज उपचारादरम्यान बळी गेला आहे. खानापूर तालुक्यात आज सर्वांधिक २२० तर सांगली महापालिका क्षेत्रात २६६ इतके रुग्ण आढळून आले आहेत. 

आज तालुका निहाय तपशिल आढळून आलेले कोरोना बाधित रुग्ण पुढीलप्रमाणे :  आटपाडी- १४८,जत- १०० ,कडेगाव- ३६, कवठेमहांकाळ- ८२, खानापूर- २२०, मिरज-१८१, पलूस- ६४ ,शिराळा- ८०, तासगाव- १२७ ,वाळवा-५९ महानगरपालिका - २६६ (सांगली- १७६, मिरज- ९०) असे एकूण १३६३ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 

आज दिवसभरात ९२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संजय साळुंखे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments