Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

मिरजेतील शासकिय तंत्रनिकेतन येथील कोविड सेंटरला आ. गाडगीळ यांची भेट

सांगली (प्रतिनिधी) : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आदीसागर प्रमाणेच 120 बेडचे कोविड हॉस्पिटल मिरज शासकीय तंत्रनिकेतन येथे हे कोविड हॉस्पिटल सुरू होत आहे त्यानुसार कोविड सेंटरला आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे यांनी आ. गाडगीळ यांना येथे सुरु होत असलेल्या कोविड सेंटरमध्ये उपलब्ध होणाऱ्या सर्व सोयी-सुविधांची माहिती दिली.

सर्व गोष्टींची माहिती घेतल्यावर आ. गाडगीळ यांनी याठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटीलेटर सह अन्य सोयी-सुविधा देण्याच्या सूचना दिल्या. कोरोनाबाधितांची अजिबात हेळसांड होऊ नये याची प्रशासनाने दखल घ्यावी अशी सूचनाही आ. गाडगीळ यांनी केली. महापालिकेने कोरोनाच्या पहिल्या लाटेत सांगली-कोल्हापूर रस्त्यावर आदिसागर कार्यालय येथे कोविड सेंटर सुरु केले होते. महापालिका क्षेत्रात सध्या १५ कोविड सेंटर सुरु आहेत. त्याचप्रमाणे प्रशासनातर्फे विविध ठिकाणी लसीकरण करण्यात येत आहे. 

महापालिका क्षेत्रातील नागरिकाचे जवळपास ५२ टक्क्या पेक्षा अधिक लसीकरण झाले आहे. येत्या १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्यास केंद्राने परवानगी दिली आहे. त्यानुसार नियोजन लावावे, अशी सूचना आ. गाडगीळ यांनी दिली. या भेटी वेळी स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, नगरसेवक गजानन मगदूम, महिला मोर्चा अध्यक्ष स्वाती शिंदे, अनारकली कुरणे, सविता मदने, अशरफ वांकर, बंडू सरगर, रघुनाथ सरगर, श्रीकांत वाघमारे, तसेच महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, वैभव वाघमारे, आप्पा हलकुडे, आदी अधिकारी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments