Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडात ड्रोनच्या सहाय्याने दोन दारू दुकानांवर कारवाई

कुपवाड (प्रमोद अथणिकर) : कुपवाड मधील दोन देशी दारू दुकानावर आज कुपवाड पोलिसांनी कारवाई करत त्याच्या कडून वीस हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, जिल्हाधिकारी सांगली यांचे आदेशाने देशी दारु दुकान यांना आस्थापना बंद करुन शासनाने दिलेल्या निर्देशानुसार घरपोच सेवा देणेची आहे. कुपवाड पोलीस ठाणे हददीत ड्रोनच्या सहायाने लोकांच्या गर्दीवर नजर ठेवुन पाहणी करीत असताना पुजा देशी दारु दुकान शरदनगर कुपवाड चालक सुभाष बापू माने व हनुमान नगर कुपवाड येथील सरगर देशी दारू दुकान याचे चालक भुपाल रामचंद्र सरगर यांनी आपले देशी दारु दुकान सुरू करून दारू विक्री करीत असताना मिळून आले असता त्याच्यावर कारवाई करुन प्रत्येकी १० हजार प्रमाणे २० हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे हृदरदीतील सर्व देशी दारू दुकान चालक व मालक यांना सीआरपीसी कलम १४९ प्रमाणे नोटीस देण्यात आलेली आहे. शासनाच्या नियमाचे उल्लघंन केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून दुकान सिल करण्यात येणार असून असे या बाबत नोटीस सर्व देशी दारू दुकानदार यांना देण्यात आलेली आहे.

यावेळी सपोनि निरज उबाळे, पोलीस उप निरीक्षक आर. एस. अन्रछत्रे, तुषार काळेल, सफो युवराज पाटील, पोहेकों शिवानंद गव्हाणे, पो. ना. सतिश माने, इंद्रजित चेळकर, शिवाजी ठोकळ, पोशि विजय घस्ते व ड्रोन ऑपरेटर जुबेर इनामदार असे भाग घेतलेला आहे.

Post a Comment

0 Comments