Daily Mahasatta

Daily Mahasatta

बाळासाहेब... तुम्ही उद्घाटनाला यावे !

स्व . डॉ . पतंगराव कदम यांचे अथक प्रयत्नातून सुमारे ३ कोटी रुपये खर्च करून उभी झालेली आरोग्य केंद्राची इमारत एक वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत
कडेगाव ( सचिन मोहिते ) :  वांगी (तालुका कडेगाव) येथे स्व . डॉ . पतंगराव कदम यांचे अथक प्रयत्नातून सुमारे ३ कोटी रुपये खर्च करून उभी झालेली आरोग्य केंद्राची इमारत एक वर्षासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे सदर इमारत, ' बाळासाहेब... तुम्ही उद्घाटनाला यावे, साहेबांचे स्वप्न साकार करावे !.. अशी जणू सादच महाराष्ट्राचे कृषी राज्य मंत्री डाॅ विश्वजीत कदम यांना घालत आहे.

कडेगाव - पलुस मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत झटणारे नेते म्हणून स्व. डॉ . पतंगराव कदम यांची ओळख होती. वांगी येथे सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे अशी मागणी डॉ पतंगराव कदम यांचेकडे ग्रामस्थांनी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत कदम साहेबांनी वांगी गावासाठी आरोग्य केंद्र मंजूर करून आणले. प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झालेनंतर बांधकामासाठी जागेची चाचपणी केल्यानंतर वांगी ग्रामपचांयतीच्या गट नं ३२६४ मध्ये इमारत बांधकाम करण्याचे निश्चित झाले. ग्रामपंचायतीने ती जागा जिल्हा परिषदेच्या नावे करून दिली . बर्‍याच अडचणीतून आरोग्य केंद्राच्या इमारतीचे कामही पूर्ण झाले. परंतु ताकारी योजनेच्या पाण्यामुळे सतत आरोग्य केंद्रास पाण्याचा विळखा पडत आहे .

शासनाने सुमारे २ कोटी ९८ लाखांचा निधी खर्च करून वांगी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी केली आहे. कोरोना कालावधीत ३५ ऑक्सीजन बेडची सोय तसेच आरोग्य केंद्रासाठी वैयक्तिक ट्रान्सफार्मर, वीज पूरवठा खंडित झालेनंतर अडचण येऊ नये म्हणून बॅटरी बॅकअपची सोय, नळ कनेक्शन इत्यादी सह सुसज्ज इमारत आरोग्य विभागाच्या ताब्यात दिलेली आहे. या आरोग्य केंद्राचा लाभ परिसरातील वांगी , तडसर , हिंगणगाव खु , शेळकबाव , शिवणी , अंबक , रामापूर , आसद व येवलेवाडी या नऊ गावांना होणार आहे. परंतु अद्याप या आरोग्य केंद्राचे उद्घाटन झाले नाही.

कोरोनाच्या पुन्हा आलेल्या भीषण संकटात वांगी आरोग्य केंद्र सामान्य लोकांना जीवनदान देणारे ठरणार आहे. त्यामुळे कृषी राज्य मंत्री डाॅ विश्वजीत कदम यांनी स्वतः लक्ष घालून हे प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरु करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

0 Comments