Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठ येथील पाटील कुटुंबियांकडून वैद्यकीय साहित्याचे वाटप

पेठ (रियाज मुल्ला) : रुग्ण सेवा हि ईश्वर सेवा मानून उपचाराअंती घरी असलेल्या पेठ पंचक्रोशीतील गरजू, होतकरू, गरीब रुग्णांना वैद्यकीय साधनांची उपलब्धता करून देण्याचा स्तुत्य उपक्रम पेठ येथील पाटील कुटुंबियांनकडून करण्यात आला.

पेठ येथील कै. संभाजीराव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त परिस्थिती अभावी ज्या रुग्णांना घरगुती वैद्यकीय साधनांची उपलब्धता होत नसेल अशा गरजू रुग्णांना कामोड चेअर,वाकिंग स्टिक, पाण्याची गादी, हवेची गादी, लघवीचे भांडे,फोवलर बेड,वोकर, होम व्हिजिट, इंजेक्शन देणे,आदी सुविधा साधने मोफत वाटप करण्यात आली. पाटील कुटुंबीयांनी पुण्यस्मरणदिना निमित्त बाकी खर्चाला फाटा देत हा एक आगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबविल्याने परिसरातून त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.

ग्रामपंचायत सदस्य,सरपंच,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती,जिल्हा परिषद सदस्य असा राजकीय वारसा असणाऱ्या पाटील कुटुंबीयांनी समाजाची वैद्यकीय गरज ओळखून एक सामाजिक ऋण समजून पै. जयंत संभाजीराव पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय पाटील, सयाजी पाटील,अरुण पाटील,उदय पाटील,भगत पाटील , डॉ. मानसिंग पाटील या सर्व पाटील कुटूंबियानी एकत्रितपणे विचार करून दवाखान्यातील उपचाराअंती घरात असणाऱ्या रुग्णांना परिस्थिती अभावी ज्या वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत अशा रुग्णांना वैद्यकीय सेवा-साधने देण्याचे समाजकार्य सुरु केले असून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

यावेळी गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना प्रतीक पाटील यांचे हस्ते वोकर ,पाण्याची गादी, हवेची गादी वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव भांबुरे यांनी केले. याप्रसंगी युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष संग्रामदादा पाटील,युवा नेते अतुल पाटील,शामराव पाटील,भागवत पाटील, संदीप पाटील, ज्ञानेश्वर पेठकर, माणिक देशमाने, हणमंत कदम, रवींद्र माने आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments