Daily Mahasatta

Daily Mahasatta

' शिवप्रताप ' मल्टीस्टेट पतसंस्थेचा २६० कोटींचा व्यवसाय


शिवप्रताप मल्टिस्टेट पतसंस्थेने कोरोना काळात आर्थिक मंदी असताना सुद्धा व्यवसायात ५४ कोटी रुपयांनी वाढ नोंदविली आहे.

विटा (प्रतिनिधी)
येथील प्रतिथयश शिवप्रताप मल्टिस्टेट पतसंस्थेने कोरोना काळात आर्थिक मंदी असताना सुद्धा व्यवसायात ५४ कोटी रुपयांनी वाढ नोंदविली आहे. संस्थेने आर्थिक वर्षा मध्ये ठेवी मध्ये जवळपास ३० कोटी तर कर्जा मध्ये २५ कोटीने वाढ झाली असून संस्थेने एकूण २६० कोटीचा व्यवसाय केला आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन मा. प्रतापशेठ (दादा)साळुंखे यांनी दिली आहे.

चेअरमन मा. प्रतापशेठ (दादा)साळुंखे म्हणाले, सभासदांचा संस्थेवरती असणारा विश्वास अधिक दृढ होत आहे. कोरोना महामारीमुळे संपूर्ण बाजारपेठा बंद असताना सुद्धा ठेवी व कर्जामध्ये भक्कम वाढ नोंदविली आहे. या मध्ये संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी केलेले अथक परिश्रम, संचालक मंडळ करत असलेला गतिमान कारभार त्या प्रमाणे पिग्मी एजंट यांच्या प्रयत्नाने ही नेत्र दीपक प्रगती साधली आहे. संस्थेने सुद्धा कोरोना परिस्थिती मध्ये दोन पावले पुढे राहून मदतीचे कार्य केले आहे. तर सभासदांना आपला व्यवसाय पुन्हा उभारणेसाठी तातडीचे कर्ज वाटप करून त्यांना सहा महिन्यांची हप्ता व व्याज भरण्यास सवलत दिली आहे. व्याज दरात ३% कपात करून अर्थव्यवस्था गतिमान करण्याचे कार्य केली आहे. या सर्वांची पोहच पावती म्हणूनच व्यवसायात एवढी प्रगती शक्य झाले आहे.

यावेळी कार्यकारी संचालक श्री. विठ्ठलराव साळुंखे म्हणाले नोटा बंदी, जी एस टी, कोरोना या एका मागे एक अशी अनेक संकटे गेल्या चार वर्षात आली त्यामुळे अर्थ व्यवस्था पुरती कोलमडलेलआहे. या परिस्थितीस धैर्याने सामोरे जाऊन सभासदांच्या दृढ विश्वासामुळे आपण इथपर्यंत येऊ शकलो आहोत. येथून पुढच्या काळात ठेवींवरील व कर्जावरील व्याजदर कमी करावे लागतील. त्यामुळे निश्चितपणाने कर्जावरील व्याजदर कमी होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. नेहमी प्रमाणे याही वर्षी एन पी ए ०% करू शकलो त्या बद्दल ही सर्व कर्जदार यांचे आभार आहोत.

संस्थेची एकूण सांपत्तिक स्थिती पुढीलप्रमाणे आहे : भाग भांडवल ४ कोटी ०७ लाख, ठेवी - १४८ कोटी ८८ लाख, स्वनिधी ११ कोटी ४३ लाख, गुंतवणूक - ६० कोटी ५६ लाख, सोनेतारण - ६२ कोटी ८३ लाख, इतर - ४८ कोटी ३८ लाख, खेळते भांडवल - १६५ कोटी १९ लाख, नफा १ कोटी ८१ लाख असल्याची माहिती साळुंखे यांनी दिली आहे.

यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन मा. हणमंतराव सपकाळ, आलम पटेल, सुरेखाताई जाधव, सिताराम दादा हरुगडे, गोपाळ तारळेकर, शिवाजीराव माने व सर्व विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments