Daily Mahasatta

Daily Mahasatta

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी भरघोस निधी मंजूर

शिराळा (विनायक गायकवाड) : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या व पुलांच्या कामासाठी केंद्र सरकारच्या केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा निधी (सी. आर. आय. एफ.) मधुन शिराळा - कापरी - कार्वे - लाडेगाव - येडेनिपाणी - गोटखिंडी - बावची - आष्टा या रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणा करणे कामाकरिता ३ कोटी ८९ लाख रुपयांचा भरघोस निधी मिळाला असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.

लोकसभा मतदार संघातील येणाऱ्या तालुक्यातील इतर रस्ते कामांसाठी एकूण मिळून ५५ कोटी ४१ लाख रूपयांची तरतूद केंद्र सरकारच्या केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा निधी (सी. आर. आय. एफ.) मधुन करण्यात आलेली आहे. मतदारसंघातील अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या व पुलाच्या कामासाठी निधी मंजूर करणे कमी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांचे सहकार्य लाभले. मतदार संघातील उर्वरित पूल व रस्तेही केंद्र शासनाच्या विविध योजनांमध्ये प्रस्तावित करून कामे पूर्ण करणार असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments