Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिक्षण सेवकांना कोविडची ड्युटी नको : शिक्षक संघाची मागणी

सागंली (प्रतिनिधी) :  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वेक्षणापासून ते लसीकरणा पर्यंत तसेच  कोरोना सेंटर पासून ते चेक पोस्ट पर्यंत अनेक ठिकाणी कोरोना आपत्ती निवारणाचे कार्य प्रामाणिक पणे गेले वर्षभर प्राथमिक शिक्षक करत असून जे शिक्षक नवनियुक्त आहेत ज्यांच्या सेवेची अद्याप तीन वर्ष पूर्ण नाहीत अशा शिक्षण सेवकांना कोविड ड्युटीतून वगळण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना या मागणीचे लेखी निवेदन देण्यात आले.
           शिक्षण सेवकांची नियुक्ती शासनाकडून तीन वर्षाकरिता ठोक मानधनावर करण्यात येते.तीन वर्षाच्या कालावधीत नैमित्तिक रजे व्यतिरिक्त अन्य कोणतेही सेवा विषयक लाभ शिक्षण सेवकांना देय नसतात त्यामुळे असा कर्मचारी कर्तव्यावर असताना त्याचा कोरोना मुळे मृत्यू झाल्यास तो नियमित कर्मचारी नसल्यामुळे त्याच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात अडचणी येतात तसेच त्यांच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही.अनेक शिक्षण सेवक हे बाहेरील जिल्ह्यातून सेवेसाठी आले असल्यामुळे सेवा बजावत असताना ते बाधित झाले तर त्यांच्या राहण्याचा आणि जेवणाचा प्रश्न निर्माण होतो या सर्व अडचणींचा विचार करता शिक्षण सेवक पदावर असणाऱ्या शिक्षकांना कोरोना कामकाजा करिता नियुक्त करण्यात येऊ नये व यापूर्वी नियुक्ती केली असल्यास त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे अशा पद्धतीची मागणी शिक्षक संघाच्या वतीने  जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.तसेच 53 वर्षावरील प्राथमिक शिक्षक ,बिपी, शुगर व गंभीर आजार असलेल्या प्राथमिक शिक्षकांना  कोरोना कामकाजातून वगळण्यात यावे तसेच कोरोना कामकाजावर नियुक्त सर्व प्राथमिक शिक्षकांना लसीकरणाचा लाभ देण्यात यावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली.अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ जुनी पेन्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील ,जिल्हाध्यक्ष अमोल माने व  जिल्हा उपाध्यक्ष महेश चौगुले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments