Daily Mahasatta

Daily Mahasatta

कर्मवीर पतसंस्थेस १३ कोटीचा ढोबळ नफा : श्री. रावसाहेब पाटील


कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली या संस्थेस सन २०२० - २०२१ या आर्थिक वर्षात रुपये १३ कोटी १० लाख इतका भरघोस नफा
सांगली (प्रतिनिधी)
येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली या संस्थेस सन २०२० - २०२१ या आर्थिक वर्षात रुपये १३ कोटी १० लाख इतका भरघोस नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी दिली.

मागील आर्थिक वर्षात आपल्या भागात आलेला महापूर आणि त्या पाठोपाठ कोरोनामुळे झालेली व्यवहार बंदी व जागतिक मंदी अशा विपरीत परिस्थितीत देखील संस्थेने सर्वच बाबतीत अतिशय चांगली कामगिरी केली आहे. संस्थेला झालेल्या ढोबळ नफ्यातून राखीव निधीसह विविध
कारणासाठी रुपये ६ कोटी ६० लाखाची तरतुद करुन संस्थेला रुपये ६ कोटी ५० लाखाचा निव्वळ नफा झाला.

आर्थिक वर्ष २०२१ अखेर संस्थेची सांपत्तिक स्थिती या प्रमाणे आहे. ठेवी ५५६ कोटी ६५ लाख झाल्या आहेत. संस्थेचे कर्ज वाटप रु. ४११ कोटी ८५ लाख, वसुल भागभांडवल २१ कोटी ७३ लाख , संस्थेची अन्य बँकातील गुंतवणूक रु.१८३ कोटी ६४ असून खेळते भांडवल ६४१ कोटी असून संस्थेचा एकूण व्यवसाय १००० कोटी पर्यंत गेला आहे. संस्थेचा ढोबळ एनपीए १.५५ टक्के असून नेट एनपीए शुन्य टक्के राहिला आहे याची माहिती चेअरमन श्री. रावसाहेब पाटील यांनी दिली आहे.

श्री. रावसाहेब पाटील चेअरमन झालेपासूनचे कालखंडात ठेवीमध्ये ८१ टक्के, कर्जात ८० टक्के , नफ्यात ९५ टक्के , भागभांडवलात ५० टक्के , निधीमध्ये ४० टक्के, गुंतवणूकीत ७५ टक्के इतकी भरघोस वाढ झाली आहे.

कर्मवीर पतसंस्था सांगली, कोल्हापूर , सातारा कार्यक्षेत्रात ५१ शाखांच्या माध्यमातून आधुनिक सेवा प्रदान करीत आहे. संस्थेचे सांगली येथील आधुनिक कार्यालय लवकरच लोक सेवेत येणार आहे पुढील वर्षाचे नियोजन देखील संस्थेने तयार केले असून सभासदांना आधुनिक सेवा देणेसाठी यामध्ये
संस्थेच्या संपुर्ण आधुनिकीकरणाचे उद्दीष्ट संस्थेने ठेवले असल्याची माहिती चेअरमन यांनी दिली.

यावेळी संस्थेच्या व्हाईस चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, संचालक अॅड. एस. पी. मगदूम , डॉ. नरेंद्र आनंदा खाडे , डॉ. रमेश वसंतरात ढबू ,श्री. लालासाहेब भाऊसाो थोटे, श्री. अ. के. चौगुले ( नाना ) , श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले , संचालिका सौ. ललिता अशोक सकळे , तज्ञ संचालक डॉ. एस. बी. पाटील ( मोटके) , संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments