Daily Mahasatta

Daily Mahasatta

भवानीनगर - गणेश खिंड रस्त्यावरील भुयारी मार्ग ठरतोय मृत्यूचा साफळा

वाळवा (रहिम पठाण) : भवानीनगर ता. वाळवा येथील रेल्वे रुळा खालून गणेश खिंडी कडे जाणारा मार्ग सर्वांच्या साठी मृत्यूचा सापळा ठरतोय. रुळा खालील बोगद्यामध्ये कायम पाणी साठून राहते. या मार्गावरुन रोज शेकडो लोक प्रवास करतात. लोकांना इथून प्रवास करताना जीव मूठीत धरुनच प्रवास करावा लागतोय.
......................................................
......................................................

परवा याच मार्गावरुन जेष्ठ नागरीक श्री. विठ्ठल पांडुरंग पाटील (नाना) मु. पो. सोनकीरे हे टु व्हीलर वरुन भवानीनगर कडून सोनकीरेकडे निघाले होते. पुला खाली कायम स्वरुपी पाणी साठते. त्यामुळे त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले व ते खाली पडले. यावेळी त्यांच्या नाका तोंडात पाणी गेल्याने जीवावर बेतले होते. परंतु सुदैवाने अनर्थ टळला.

या सगळ्या धोक्याचा विचार करुन अर्थक्रांती ज्येष्ठ नागरी संघटनेच्या वतीने आज उपोषण करण्यात आले. यावेळी या प्रलंबीत मार्गाच्या दुरुस्तीवर त्वरीत लक्ष द्यावे व धोकादायक रस्त्यावर काँक्रीटीकरण करुन नागरीकांची सोय करावी या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपोषण ठिकाणी गर्दी होऊ नये याची दखल घेण्यात आली होती. यावेळी कडेगाव तालुक्यातील सोनकिरे, वाजेगाव, पाडळी, आसद, चिंचणी, वांगी तसेच वाळवा तालुक्यातील बिचुद ग्रामपंचायतीनी पत्र देऊन पाठिंबा दिला आहे. या वेळी उपोषणासाठी काँग्रेस चे जेष्ठ नेते आमदार मा. मोहनराव कदम यांनी पाठींबा दिला तर वाळवा तालुका भाजपा अध्यक्ष मा. धैर्यशील मोरे यानी ही पाठींबा जाहीर केला आहे. सर्व लोकप्रतिनीधीनी याचा सहानभूती विचार करुन नागरीकांचा त्रास कसा कमी करता येईल ते पहावे . 

यावेळी उपोषणासाठी सांगली जिल्हा अर्थक्रांती जेष्ठ नागरीक संघटनेचे अध्यक्ष  जगन्नाथ मोरे, विठ्ठल पाटील अशोक गोडसे, नारायण सावंत जेष्ठ नागरीक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments