Daily Mahasatta

Daily Mahasatta

भिलवडी येथे कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणास चांगला प्रतिसाद..

१६ एप्रिल अखेर भिलवडी येथील ५७९२ सह प्रा.आ. केंद्राअंतर्गत एकूण ९२६५ नागरिकांनी घेतला लसिकरणाचा लाभ..

भिलवडी (खंडेराव मोरे) : भिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये देण्यात येत असलेल्या कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून,१६ एप्रिल अखेर भिलवडी आरोग्य केंद्रामध्ये ५७९२ नागरिकांनी लसिकरणाचा लाभ घेतला आहे.

कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाबाबत लोकांच्या मनात अनेक तर्कवितर्क सुरू होते.परंतू कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लसिकरण विभागाला भेट दिली त्यावेळेस लसिकरणाबाबत नागरिकांनी गैरसमज करून घेऊ नयेत.पंचेचाळीस वर्षांवरील सर्वांनी लसिकरण करून घ्यावे असे आवाहन केले होते.त्याला प्रतिसाद देत माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम (दादा) पाटील, भारतीताई गुरव, भिलवडी गावचे माजी सरपंच शहाजी गुरव, चंद्रकांत पाटील यांच्यासह राजेंद्र उर्फ बाबा शिंदे, बाबासाहेब मोहिते या काँग्रेस नेत्यांनी लसिकरण करून घेतले तर दिपक पाटील यांच्यासह व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांनी भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लसिकरण विभागात जाऊन लसिकरण करून घेतले.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.काळे यांनी उपस्थितांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम (दादा) पाटील यांनी भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राला अंतर्गत येणाऱ्या लसिकरण केंद्रा विषयी माहिती घेतली. भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दि.१६ एप्रिल अखेर ५७९२ नागरिकांनी लस घेतली असून, अंकलखोप उपकेंद्रात १२१२,बुरूंगवाडी उपकेंद्रामध्ये११५० तर आमणापूर उपकेंद्रामध्ये ११११  असे भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्र व तीन उपकेंद्रामध्ये एकूण ९२६५ नागरिकांनी लसिकरणाचा लाभ घेतला असल्याची माहिती भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक एस.एच.ननावरे यांनी दिली.सदरची आकडेवारी चांगली असून जास्तीत जास्त लोकांनी लसिकरण करून घ्यावे असे आवाहन संग्राम (दादा) पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments