सांगली (प्रतिनिधी) : येथील वृत्तपत्र विक्रेते राज्य संघटनांचे संचालक सामाजिक कार्यकर्ते मारुती नवलाई यांनी वृत्तपत्र क्षेत्रातील सर्व घटकांनी कोविडशिल्ड लस घ्यावी, असे आवाहन केले आहे.
मारुती नवलाई यांनी त्रिमूर्ती चौक 100 फुटी रोड येते आज जागतिक आरोग्य दिन दिवशी केंद्रात आज लस घेतली. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन 45 वर्षावरील सर्व नागरिकांना लस घेण्याचे आव्हान मारुती नवलाई यांनी केले. ही लस मोफत देण्यात येत आहे. आज अखेर हजारो नागरिकांना या लसीचा फायदा घेतला.
यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड या पैकी कोणत्याही एका ओळखपत्राची छायांकित प्रत असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वृत्तपत्र व्यवसाय हा अत्यावश्यक सेवेत असून विक्रेत्याना अनेक वाचकांपर्यंत जावे लागते. अनेक घटाकापर्यंत पोहचावा लागतो म्हणून त्वरीत विक्रेत्यांनी व सर्व बांधवानी लस घ्यावी, असे आवाहन राज्य संचालक मारुती नवलाई यांनी केले.
0 Comments