Daily Mahasatta

Daily Mahasatta

महापालिका अग्निशमन विभाग सक्षम करणार : महापौर दिग्विजय सूर्यवंशी

सांगली (प्रतिनिधी) : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग सक्षम करण्यात येईल यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांच्याशी चर्चा करून आवश्यक निर्णय घेऊ अशी घोषणा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केली आहे. 

सांगली महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून 14 एप्रिल रोजी अग्निशामक दिन साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात महापौर सूर्यवंशी बोलत होते. कार्यक्रमास मनपा उपआयुक्त राहुल रोकडे , नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, प्रकाश मुळके, नगरसेविका सौ. वर्षा निंबाळकर , मुख्य अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे , कार्यशाळा विभागाचे प्रभारी तेजस शहा यांची उपस्थिती होती. प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन करण्यात आले. 

यावेळी अग्निशामक विभागाकडून मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. यावेळी फोर्ट ट्रस्ट येथे बळी पडलेल्या अग्निशामक जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Post a Comment

0 Comments