Daily Mahasatta

Daily Mahasatta

सुर्ली घाटातील डोंगर उत्खननाचे इटीएस मशीनद्वारे मोजमाप करावे : अश्विनीताईं वेताळ-पाटील

कडेगाव (सचिन मोहिते) : सुर्ली, विहापूर घाटातील डोंगर उत्खननाचे इटीएस मशीनद्वारे मोजमाप करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अश्विनीताईं वेताळ-पाटील यांनी केली आहे. 

अश्विनीताई वेताळ - पाटील यांनी म्हंटले आहे, 
विकासाच्या नावाखाली पर्यावरण भकास झाल्याचे भयाण वास्तव चित्र सध्या सुर्ली, विहापुर डोंगर पट्ट्यात पाहावयास मिळत आहे. स्टोन क्रशर व्यवसायवाल्यांकडुन डोंगर व माळरानावरील जमिनीवर खुलेआम दरोडा टाकुन खोदकाम केले जात आहे. यातील वैध किती अवैध किती डोंगर उत्खनन केले जात आहे, याचा हिशोब घेणे शासकीय महसुलाच्या दृष्टीने आवश्यक आहे. उत्खननासाठी नाममात्र रॉयल्टी शुल्क भरून त्या परवानगीखाली हजारो ब्रास डोंगर उत्खनन करून उखळ पांढरे करण्याचा हा धंदा सध्या तेजीत सुरू आहे. अशा प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरला जात असल्याने पर्यावरणाची हानी होत आहे.
महसूल यंत्रणेने याबाबत अधिक तपास, माहिती घेऊन या परवानगी व्यतिरिक्त अवैधरीत्या झालेल्या डोंगर उत्खनन करणाऱ्यांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करून शासनाचा स्वामित्व धनापोटी मिळणारा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवितात. त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. कडेगाव तालुक्यातील विहापुर,सुर्ली परिसरातील झालेले डोंगर उत्खनन व इतर ठिकाणी झालेल उत्खनन पाहून संबंधित तलाठी सजाच्या कार्यक्षेत्रात हे उत्खनन झाले आहे; त्याची मोजमापे घेऊन संबंधिताकडून दंड आकारणीसह महसूल गोळा करावा, अशी मागणी होत आहे. महसूल विभागास हा प्रकार लक्षात आणुन दिला असुन संबंधित अधिकार्यांनी याबाबत तातडीने दक्षता घेऊन उत्खनन केलेल्या जागेची मोजमाप घेऊन तसा अहवाल वरिष्ठांना सादर करावा. 

यावर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया करून वसूल करणे नितांत गरजेचे असल्याने विभागीय महसूल अधिकारी तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी याबाबत संयुक्तपणे या प्रकरणाची चौकशी करावी. राज्य शासनाच्या महसूल तिजोरीत खडखडाट असताना अवैध डोंगर उत्खनातून शासनाच्या लाखो रुपयांचा कर बुडवून धंदा करणार्यांना वचक बसविण्यासाठी खणीकर्म विभागाने ठोस पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी सामाजीक कार्यकर्त्या अश्विनीताईं वेताळ-पाटील व सुर्ली,विहापुर परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments