Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर, दिवसभरात पाचजणांचा बळी

सांगली (प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्यात कोरोना चा विस्फ़ोट सुरुच असून आज गुरुवार ८ एप्रिल रोजी एकाच दिवशी जिल्ह्यात सर्वाधिक ४०५ रुग्ण आढळून आले. यामध्ये सांगली शहरात ११० इतके रुग्ण आढळून आले आहेत.

सांगली जिल्ह्यातील लाॅकडाऊन शिथील करण्यात यावा या मागणीसाठी व्यापारी, विक्रेते रस्त्यावर येऊन मोर्चे काढत असताना जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा मात्र नियंत्रणाच्या बाहेर जात आहे. आज भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून लाॅकडाऊन शिथील करण्याची मागणी करण्यात आली. तर संभाजी भिडे यांनी तर कोरोना नसल्याचे जाहीर करुन टाकले. एका बाजूला लाॅकडाऊनला विरोध होत असताना सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा मात्र धक्कादायक आहे.

आज सांगली जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढील प्रमाणे : आटपाडी २३, जत २३, कडेगाव २३, कवठेमंहकाळ ७, खानापूर २४, मिरज ४२, पलूस २१, शिराळा २०, तासगाव २४, वाळवा ५२ तसेच सांगली शहर ११० तर मिरज शहर ३६ असे एकूण ४०५ रुग्ण आढळून आले. आज रोजी जिल्ह्यात ३२४१ रुग्ण उपचाराखाली आहेत. तर गेल्या तीन दिवसांत १५ जणांचा कोरोनाने बळी गेल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 

Post a Comment

0 Comments