Daily Mahasatta

Daily Mahasatta

जयंत दारिद्र्य निर्मुलनातून तिला मिळालं हक्काच घरकुल

 

युवा नेते प्रतिक पाटील आणि अतुल पाटील यांच्या प्रयत्नातून जयंत दारिद्रय निर्मूलन अभियान अंतर्गत अरुणा रंगराव मुळीक यांच्या कुटुंबाला मिळाले सुसज्ज असे हक्काच जयंत घरकुल.
पेठ (रियाज मुल्ला) : पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेठेचे युवा नेते अतुल पाटील यांच्या प्रयत्नातून जयंत दारिद्रय निर्मूलन अभियान अंतर्गत येथील अरुणा रंगराव मुळीक यांच्या कुटुंबाला मोफत सुसज्ज असे जयंत घरकुल मिळाले. प्रतीक पाटील यांचे हस्ते या घरकुलाच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या.

पेठ ता. वाळवा येथील श्रीमती अरूणा रंगराव मुळीक यांच्या पतीचे 40 वर्षापूर्वी निधन झाले, शेती नाहीं घरात कर्ता पुरुष नाही, पोटी एकच मुलगी घेऊन माहेरी आल्या. चार घरची धुणीभांडी करुन संसाराचा गाडा चालवू लागली. मुलीचे लग्न झाले पण पुन्हा नियतीने घात केला .जावयाचे आकस्मिक निधन झाले तर काही दिवसात मूलगीसुद्धा अस्थमाने निधन पावली. पुन्हा नातवंडांसह संघर्ष चालू राहिला, आशा परिस्थितीत नातवाला 12 वि पर्यंत शिक्षण दिले.

रहायला एक छोटंसं दोन खोल्यांचं पण जीर्ण झालेलं घर, कमी जागेमुळे शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळत नव्हता. खूप दिवसापासून त्या कुटुंबाची घराची मागणी होती. ही गोष्ट पेठचे युवा नेते अतुल पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या कुटुंबाला घर बांधून देण्यासाठी प्रयत्न चालू केले. बांधकाम साहित्याची जुळवाजुळव चालू केली तसेच युवा नेते प्रतिकदादा व राजवर्धन पाटील यांच्याकडे ही समस्या बोलून दाखवली. कोणताही विलंब न करता राजवर्धन भैय्यांनी जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान अंतर्गत घर बांधून देण्याची तयारी दाखवली. 

सर्व कागदपत्रांची पूर्तता करून नामदार जयंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते प्रतिक पाटील (दादा) व राजवर्धन पाटील (भैय्या) यांच्या प्रयत्नाने 'जयंत दारिद्रय निर्मूलन अभियान ' मार्फत त्या कुटुंबाला उपलब्ध जागेत सर्व सोयीनियुक्त " जयंत घरकूल" बांधून देण्यात आले. आज सकाळी मा. प्रतिक जयंतराव पाटील (दादा) यांच्या हस्ते त्या कुटुंबाला घरकुलच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. 

यावेळी राजाराम बापू बँकेचे चेअरमन शामराव पाटील अण्णा, युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संग्राम पाटील दादा, युवा नेते अतुल पाटील बापू, विजय पाटील भाऊ, संदीप पाटील, जयंत दारिद्रय निर्मुलन अभियानाचे समन्वयक इलियास पिरजादे, जालिंदर पाटील, रचनाकार राहुल पाटील, कॉन्ट्रॅक्टर संजय पाटील, इस्लामपूर युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष स्वरूप मोरे, भागवत पाटील, डॉ. सुभाष भांबुरे, संतोष देशमाने, अशोक पाटील, तुळशीदास पिसे, लहु गुरव, दीपक जाधव, रविकिरण बेडके, संतोष बाबर, शिवाजी खापे, शहाजी पवार, विजय चव्हाण, शिवाजी पाटील, अरुण सातपुते, सचिन पेटकर, अमित पाटील, अविष्कर पवार, शैलेश पाटील, भानुदास माळी, भास्कर माळी सर, अधिक गुरव, अशोक शेलार, संदीप शेलार, अनिकेत पवार, सागर साळुंके, विनायक साळुंके, दीपक सूर्यवंशी, शिवाजी शेलार, सर्जेराव शेलार, महादेव माळी, विकास गोंधळी, संजय गुरव, माणिक गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments