Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विस्फ़ोट आणि मृत्युचा तांडव

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात कोरोना चा विस्फ़ोट आणि मृत्युचा तांडव आता एकाच वेळी सुरु झाले आहे. आज दिवसभरात १ हजार ११६ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर दुसरीकडे एकाच दिवशी जिल्ह्यातील २२ रुग्णांचा उपचारादरम्यान बळी गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना चा विस्फ़ोट आणि मृत्युचा तांडव सुरु झाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. 

सांगली जिल्ह्यात दररोज सुमारे १ हजार पेक्षा अधिक नवीन रुग्णांची वाढ होत आहे. तर हाॅस्पीटल फुल्ल झाल्याने बेड आणि वेळेत उपचार न मिळाल्याने आता सरासरी वीस पेक्षा अधिक रुग्णांचा बळी जात आहे. आज बुधवारी एकाच दिवशी २२ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. आज खानापूर तालुक्यात सर्वाधिक २०२ रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच खानापूर तालुक्यात आज तिघांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा विस्फ़ोट आणि मृत्युच्या प्रमाणात वाढ झाल्याने प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. 

आज सांगली जिल्ह्यात आढळून आलेले तालुकानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी ५८ , जत ४७, कडेगाव ८१, कवठेमंहकाळ ३२ , खानापूर २०२, मिरज १०५, पलूस ३५ , शिराळा ३८ , तासगाव ८५ वाळवा १८४, तसेच सांगली शहर १७५ आणि मिरज शहर ६४ असा सांगली जिल्ह्यातील १ हजार ११६ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सद्या ८ हजार ९९६ रुग्ण उपचाराखाली आहेत.

Post a Comment

0 Comments