Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोनाकाळात प्रशासनास सहकार्य करा : विशाल तिरमारे

पलूस (अमर मुल्ला) : महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा विस्फोट होत आहे. कोरोना ची दुसरी लाट महाभयंकर असल्याचे भाकीत आरोग्य तज्ञांनी वर्तविले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे,  प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विशाल तिरमारे यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना विशाल तिरमारे म्हणाले की, पलूस कडेगाव तालुक्यातील काही बेजबाबदार युवक कारण नसताना सर्व नियम धाब्यावर बसवून गाडीवरून फिरत आहे. पोलीस प्रशासनाकडून कार्यवाही झाल्यानंतर पोलिसांशी वाद करण्याचे प्रकार करत आहेत हे निंदनीय आहे. पोलीस व डॉक्टर हे स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेची सेवा करीत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनोबल वाढविणे गरजेचे आहे.

संचारबंदी कडक असल्याने गावगाड्यातील हातावर पोट असणारी माणस उपाशी राहण्याच्या मरण यातना सोसत आहेत. मागील वर्षातील लाॅकडाऊन मध्ये महाराष्ट्र शासनाने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले होते. कोणतेही आर्थिक पॅकेज दिले नव्हते.

त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले होते. तशाच प्रकारचे दिवस या कोरोना च्या दुसऱ्या लाटेत नागरिकांच्या वरती आलेले आहेत. शासनाने गंभीरपणे विचार करून नागरिकांना थेट पाच हजाराचा आर्थिक लाभ देण्यात यावा. त्याचप्रमाणे थकीत संपूर्ण विजबिले माफ करण्यात यावीत. अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विशाल तिरमारे यांनी शासनास केली आहे.

Post a Comment

0 Comments