Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

महाडिक मल्टिस्टेटला ३९ लाखाचा नफा : राहुल महाडिक

वनश्री नानासाहेब महाडिक मल्टिस्टेट अर्बन को आॕप क्रेडिट सोसायटी लि.,इस्लामपुर या सोसायटीला ३१ मार्च २०२१ अखेर संपलेल्या अर्थिक वर्षात संस्थेस ३९ लाख ६ हजार ३२२ नफा 

इस्लामपूर (हैबत पाटील)
वनश्री नानासाहेब महाडिक मल्टिस्टेट अर्बन को आॕप क्रेडिट सोसायटी लि.,इस्लामपुर या सोसायटीला ३१ मार्च २०२१ अखेर संपलेल्या अर्थिक वर्षात संस्थेस ३९ लाख ६ हजार ३२२ नफा झाले असलेची माहीती संस्थेचे संस्थापक मा. श्री. राहुल महाडिक यांनी दिली. वनश्री नानासाहेब यांच्या नावे सुरु केलेल्या संस्थेस स्थापनेपासुन सतत आॕडीट वर्ग "अ" मिळाला असुन संचालक मंडळ , कर्मचारी वर्ग व सभासद, ठेवीदार यांच्या विश्वासावर चाललेली एक आदर्श संस्था म्हणून ओळखली जात आहे .

अर्थिक वर्षामध्ये संस्थेचे अधिकृत भागभांडवल १० कोटी असुन वसुल भागभांडवल ५ कोटी ४६ लाख इतके असुन संस्थेची एकुण गुंतवणूक २३ कोटी ४० लाख एवढी आहे. चालु वर्षात सभासद ठेवीदार यांनी विश्वास दाखवून "कोविड १९" च्या काळातसुध्दा ठेवीमध्ये भरघोस वाढ झालेली आहे. संस्थेच्या एकुण ठेवी ६० कोटी ४० लाख इतकी आहे. तसेच "कोविड १९" मध्ये कर्जदारांनीसुध्दा आपली स्वतःची संस्थेमध्ये असणारी पत कायम रहावी यासाठी सुध्दा कर्जदारांनी आपली कर्जाची रक्कम भरून संस्थेस सहकार्य केलेबद्दल संस्थेचे संस्थापक राहुल महाडिक यांनी आभार मानले.

तसेच संस्थेचे एकुण कर्ज वाटप ३९ कोटी ६३ लाख एवढे झाले असुन संस्थेची आसणारी वसुलीची परंपरा १००% झाली आहे. संस्थेच्या शाखेच्या माध्यमातून बँकिग सुविधा जास्तीत जास्त सभासदांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. उदा. RTGS, NEFT, IMPS, DD व चेक क्लेरिंग , SMS सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सामाजिक कार्यात सुध्दा कोरोना काळात संस्थेच्या माध्यमातून लाॕकडाऊनच्या काळात गोरगरिब जनतेला अन्न धान्य तसेच सॕनिटायझर, मास्क. इत्यादि साहित्याची मोफत वाटप करुन संस्थेने सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेक ठेव योजना ,जीवन समृद्धी ठेव, शुभ विवाह ठेव, मासिक पेन्शन ठेव, वनश्री लखपती ठेव योजना अशा अनेक प्रकारच्या ठेव योजना व कर्ज योजना आहेत .

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. सतिश महाडिक व व्हा. चेअरमन श्री. रविंद्र आडमुठे,संचालक प्रा. प्रदिप पाटील सर,कपिल ओसवाल, सुशिल सावंत, नागेश पाटील, सागर कोरोचे, राजू मुंडे, तसेच सर्व शाखांचे शाखाधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत व्यवस्थापक आर एम बागडी यांनी केले व आभार शाखा व्यवस्थापक अमोल पाटील यांनी मानले.

Post a comment

0 Comments