आत्मशक्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला चालू वर्षी 1 कोटी 42 लाख 11 हजार रुपयांचा नफा व 200 कोटीचे व्यवसाय उद्दिष्ट्य पूर्ण
पेठ (रियाज मुल्ला) : पेठ ता. वाळवा येथील आत्मशक्ती ग्रा. बि. शेती सह पतसंस्थेला चालू वर्षी 1 कोटी 42 लाख 11 हजार रुपयांचा नफा व 200 कोटी व्यवसाय उद्दिष्ट्य पूर्ण झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन हंबीरराव पाटील यांनी दिली.
आत्मशक्ती संस्थेचे संस्थापक कै. हणमंतराव पाटील यांच्या प्रेरणेतून पेठ सारख्या ग्रामीण भागात या संस्थेची स्थापना होऊन मार्च 2021 अखेर भागभांडवल 5 कोटी 31 लाख, स्वनिधी 6 कोटी 54 लाख,ठेवी 114 कोटी 14 लाख,कर्ज 86 कोटी 2 लाख असा एकत्रित व्यवसाय 200 कोटी 16 लाख असा असून सी. डी. रेशो 70 टक्के व प्रति कर्मचारी 4 कोटींचा व्यवहार असून या संस्थेच्या पेठ , इस्लामपूर, कासेगाव, तांदुळवाडी, शेडगेवाडी, मांगले,पलूस येथे शाखा कार्यरत आहेत. RTGS व NEFT ची सुविधा सर्व शाखा मध्ये सुरू आहे. लवकरच मोबाईल बँकिंग सेवा सुरू करणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन हंबीरराव पाटील यांनी दिली.
याप्रसंगी युवा नेते डॉ. अभिजित पाटील, व्हा. चेअरमन अंबादास पेठकर,शेखर बोडरे,जेष्ठ संचालक प्रदीप पाटील,जनरल मॅनेजर संजय दाभोळे, महादेव पाटील,अरुण कदम,संजय पाटील,डॉ. मुसाअल्ली जमादार, डॉ. संजय पाटील,धनपाल जाधव,जयवंत जाधव,सौ. अरुणा पाटील, सौ. मंगल पाटील, तज्ञ संचालक सुभाष पाटील, प्रमोद सांभारे, असि. जनरल मॅनेजर सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments