Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, पहा तालुकानिहाय आकडेवारी

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात कोरोना चा विस्फ़ोट सुरु असून आज दिवसभरात सांगली जिल्ह्यात ९६२ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर दिवसभरात १४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

सांगली जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. आज शनिवार ता. १७ रोजी एकाच दिवशी जिल्ह्यातील ९६२ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सांगली जिल्ह्यात सद्या प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. सुमारे एक हजारच्या आसपास दररोज नवीन रुग्णांची वाढ होत आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी देखील नागरिकांनी काही दिवस घरात राहूनच कोरोना पासून बचाव करावा असे आवाहन केले आहे. 

आज सांगली जिल्ह्यातील १४ जणांना कोरोना मुळे प्राण गमवावा लागला आहे. तर ३६३ जणांनी आज कोरोना वर मात केली आहे. आज दिवसभरात आढळून आलेले तालुकानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी १०९, जत ३८, कडेगाव १२८, कवठेमंहकाळ ३६, खानापूर १११, मिरज ८०, पलूस २८, शिराळा २४ , तासगाव ६७, वाळवा १४२ तसेच सांगली शहर १३४ आणि मिरज शहर ६५ असा सांगली जिल्ह्यातील ९६२ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सद्या ६ हजार ६१० रुग्ण उपचाराखाली आहेत. 
-------------------------------
वाळवा तालुक्यात १४२ पाॅझिटीव्ह
वाळवा तालुक्यात आज १४२, कडेगाव तालुका १२८, खानापूर १११ तर आटपाडी तालुक्यात १०९ रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात देखील कोरोना चा विस्फ़ोट झाल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments