Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटा अर्बन बँकेस ७२ लाखाचा नफा : अॅड सदाशिवराव पाटील

 


विटा (प्रतिनिधी) : येथील विटा अर्बन बँकेस चालू आर्थिक वर्षांमध्ये ७२ लाखाचा नफा झाल्याची माहिती बँकेचे संस्थापक माजी आम. सदाशिवराव पाटील यांनी दिली. 

मार्च २०२१ अखेर बँकेकडे एकूण ठेवी ४० कोटी इतक्या असून कर्ज वाटप रु. २७ कोटी ५० लाख इतके केलेले आहे. गुंतवणूक रु. १२ कोटी ३६ लाख आहे. सी. आर. ए. आर. १७. १५%  इतका आहे. तसेच प्रती कर्मचारी व्यवसाय ४ कोटी आहे. बँकेचा निव्वळ एनपीए २% असून ऑडीट वर्ग "अ "  आहे. एकूण राखीव निधी रु. २ कोटी २३ लाख असल्याची माहिती दिली. बँकेने सहकार विभाग व रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे व निकषांचे तंतोतंत पालन केलेले असून बँकेच्या सर्व शाखा नफ्या मध्ये आहेत.

ते पुढे म्हणाले, कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीमुळे सर्वच क्षेत्रावरती विपरित परिणाम झालेला होता. अशा परिस्थितीमध्ये बँकेने ग्राहकांना चांगल्या प्रकारच्या सेवा पुरविलेल्या आहेत. बँकेने ग्राहकांच्या साठी आरटीजीएस , एनईएफटी, अत्याधुनिक लॉकर्स, एटीएम कार्ड , लाईट बील भरणा , क्युआर कोड , सीटीएस चेक बुक, मोबाईल बँकिंग ,इत्यादी सुविधा व सोने तारण गहाण कर्ज व वाहन तारण कर्जे अल्प व्याज दरामध्ये उपलब्ध असून ग्रांहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले.   

यावेळी बँकेचे चेअरमन मा. धनंजय शहा ,बँकेचे माजी चेअरमन विशाल काका पाटील, वैभव दादा पाटील व्हाईस चेअरमन हणमंत तारळेकर, शरद पाटील , विनोद तावरे, डॉ. सुरेश भंडारे, कृष्णात मदने, चंद्रशेखर गायकवाड, मधुकर भिंगारदेवे, तानाजी जाधव, सीए सचिन अबदर, सौ. वंदना मेटकरी, सौ. जयश्री बसागरे, जनरल मॅनेजर मा. संजय गायकवाड व  सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments