Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूर येथील कु. शुभांगी बंडगर यांना पीएचडी

इस्लामपूर (हैबत पाटील) : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या तिप्पेहळळी- जत युनिटचे सुरक्षाधिकारी पै. बाबासो बंडगर यांची कन्या कु. शुभांगी बंडगर हिने वयाच्या २७ व्या वर्षी पीएचडी पदवी संपादन केली आहे. कु. शुभांगी च्या या उज्ज्वल यशाबद्दल साखर कामगारांनी आनंद व्यक्त केला. राज्याचे जलसंपदा मंत्री नाम. जयंतराव पाटील यांनी तिचे अभिनंदन केले.

कु. शुभांगी हिने इस्लामपूर येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयातून बी. एस्सी केली असून तिने शिवाजी विद्यापीठातून एम. एस्सी,व पीएचडी पदवी संपादन केली आहे. तिने "केमिकल डिपॉझिशन अँड कॅरॅक्टरायझेशन ऑफ नॅनो क्रिस्टल लाईन फेरायट थिन फिल्म्स फॉर देअर एनर्जी अप्लिकेशन" या विषयात ही पीएचडी पदवी मिळविली आहे. तिला प्रा. डॉ. एस. एस. कोळेकर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. तिची जागतिक स्तरावर पाच प्रबंध प्रकाशित झाले आहेत.

राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, उपाध्यक्ष विजयबापू पाटील, तसेच कारखान्यातील अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून भावी कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या आहेत. "माझ्या आई-वडिलांचे प्रोत्साहन,भाऊ संदीप, व ऋषिकेश यांचे सहकार्य आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मी हे उज्ज्वल यश मिळवू शकले. साऊथ कोरियामध्ये सायंटिस्ट म्हणून कारकीर्द करण्याचा प्रयत्न आहे." अशी भावना कु. शुभांगीने व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments