Daily Mahasatta

Daily Mahasatta

आदर्श कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

 

विटा : जीपॅट परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करताना संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार, ॲड. सदाशिवराव पाटील संस्थेचे विद्यमान अध्यक्ष, ॲड. वैभव पाटील व प्रशांत कांबळे.

विटा (प्रतिनिधी) : राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट या परीक्षेत आदर्श फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. उच्चशिक्षणासाठी कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत महाविद्यालयाची प्रियंका जाधव, ऐश्वर्या करपे, राधिका कांबळे यांनी यश मिळविले आहे. त्यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सदाशिवराव पाटील संस्थेचे विद्यमान अध्यक्ष, ॲड. वैभव पाटील तसेच विटा नगरीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व प्रशांत कांबळे यांच्या शुभहस्ते या तिन्ही विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.

महाविद्यालयाच्या सुरुवातीपासूनच या परीक्षेमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे यावर्षी ही परंपरा कायम राखत तीन विद्यार्थ्यांनी यश संपादित केले आहे. संपादित केलेले यश खरच वाखाणण्याजोगे आहे. यासाठी महाविद्यालयाने केलेले प्रयत्नही तितकेच मोलाचे आहेत जसे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग घेणे, विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांचे मार्गदर्शन देणे, अनेक सराव चाचण्या तसेच विविध विषयांचे व्याख्याने, प्रत्येक विषयाचे प्रश्नमंजुषा सेट, सतत प्रोत्साहनात्मक मार्गदर्शन व या परीक्षेच्या तयारीसाठी जीपॅट प्रमुख, प्रा. डॉ. कैलास माळी आणि प्रा. सुमैय्या आत्तार यांनी विद्यार्थ्यांकडून अत्यंत नियोजनपूर्वक तयारी करून घेतली होती या सर्वांचे फलित म्हणून यशाची परंपरा कायम राखत महाविद्यालयाची घोडदौड चालू आहे. विद्यार्थ्यांची चिकाटी, शिक्षक- प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि प्रिन्सिपल सरांच्या पाठिंब्यामुळे हे यश संपादन करणं शक्य झालं असं विद्यार्थी सांगतात.

यावेळी प्राचार्य डॉ. निरंजन महाजन यांनी या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या देशपातळीवरील जीपॅट एम. फार्मसी प्रवेश पात्रता परीक्षेत पात्र झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्यकारी संचालक, पी. टी. पाटील यांनी अभिनंदन करून आदर्श च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे असे प्रतिपादन केले. लोकनेते मा, हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी ने आपल्या नावाप्रमाणे यशाची परंपरा कायम राखली असून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विशेष प्रयत्नामुळे हे यश मिळत असल्याचे प्रतिपादन यावेळी ॲड. सदाशिवराव पाटील यांनी केले. महाविद्यालयाच्या या यशासाठी व विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, ॲड. वैभव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments